" महानुभाव पंथ "
महानुभाव पंथ महाराष्ट्र राज्यातील एक जुना पंथ आहे श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथांचे संस्थापक होत. श्री चक्रधर स्वामी यांनी रचलेल्या लीळाचरित्र या आद्य ग्रंथातील उपदेश केशिराज बास यांनी इ.स. १२८५ च्या सुमारास संकलित केला.
केशिराज बास यांना केसोबास नावानेही ओळखले जाते. हे महानुभव पंथातील ज्येष्ठ ग्रंथकार, व संस्कृत पंडित होत. महानुभाव पंथाचे दुसरे आचार्य नागदेवाचार्य हे यांचे पट्टशिष्य. यांच्या सूचनेवरून केशिराज बास यांनी मराठी भाषेत ग्रंथ रचना केली. दृष्टांत पाठात अनेक लोककथा गुंफल्या आहेत.

